Namo Maharojgar Melava Thane : ठाणे येथे 24 व 25 फेब्रुवारी महारोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी

0

ठाणे येथे 24 व 25 फेब्रुवारीला कोकण विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नमो महारोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी

✅ रायगड दि.16 (जिमाका) :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीन ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक २४ व २५ फेब्रुवारी,2024 रोजी “नमो महारोजगार” कोकण विभागीय मेळाव्याचे आयोजन आयलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात आले असून नमो महारोजगार मेळाव्यासाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.

✅ या रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना ,उद्योजक,विविध स्टार्टअपचे स्टॉल, स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी विविध महामंडळे, कौशल्य व करिअर मार्गदर्शन करणाऱ्या संस्था, सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे व रोजगार मेळाव्याकरीता रिक्तपदांनुसार ऑनलाईन अप्लाय करावे.

✅ रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.या मेळाव्यासाठी नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी.

✅ रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड येथे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व नमो महारोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.